सिल्लोड. (प्रतिनिधी) : पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदका महाविद्यालयाची विद्याथ्यर्थ्यांसाठी आयोजित केलेली चार दिवसीय शैक्षणिक सहल नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. सहल निघताना विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर, पालक व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सहलीमध्ये इयत्ता नववी ते बारावी च्या १६४ विद्याथ्यांनी भाग घेतला. सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यास मदत करणे, भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख करून देणे हा होता. तर या सहलीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, ऐतिहासिक तसेच निसर्गसौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळ दाखवण्यात आली. त्यामध्ये इमैजिका वॉटर पार्क लोणावळा, पाली
गणपती, मुरुड जंजिरा किल्ला, श्रीवर्धन समुद्रकिनारा, चवदार तळे महाड, किल्ले रायगड, राजमाता जिजाऊ समाधी पाचाड, किल्ले प्रतापगड, शिवकालीन खेडेगाव, महाबळेश्वर, जेजुरी अशा विविध प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे म्हणाले की, या सहलीमुळे विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, पर्यावरण आणि पर्यटनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या व्याचबरोबर अभ्यासक्रमाचा भाग प्रत्यक्ष अनुभवता आला. सहलीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निसर्गाचे सानिध्य अनुभवले, विविध झाडे, फुले पाहिली आणि पर्यावरणाबद्दल माहिती घेतली, ऐतिहासिक स्थळी भेट दिल्याने विद्यार्थ्यांना इतिहासातील महत्त्वाच्या घटना आणि स्थळांची माहिती मिळाली,
ज्यामुळे त्यांचा अभ्यास अधिक मनोरंजक झाला. प्रवासात भक्ती गीते, अभंग, नाटिका, गाणी, खेळ, वनभोजन यामुळे विद्याथ्यांचा उत्साह वाढला. सहलीदरम्यान लोणावळा येथील इमॅजिका वॉटर पार्क येथे पाण्यामध्ये खेळण्याच्या मनस्रोत आनंद विद्यार्थ्यांनी घेतला, पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले.
मुरुड जंजिरा येथील समुद्रातील ऐतिहासिक किल्ल्यावर विद्यार्थ्यांना बोटीच्या माध्यमातून नेण्यात आले. श्रीवर्धन समुद्रकिनारा अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शिक्षकांनी विशेष दक्षता घेत विद्यार्थ्यांना या समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गसौंदर्याचा अनुभव दिला, महाड येथील चवदार तळ्याच ऐतिहासिक महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, तसेच राजमाता जिजाऊ समाधीचे पाचाड येथे दर्शन घेतले,
रायगड, प्रतापगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती विद्याथ्यौना दिली, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी गार्डन, मंत्रो गार्डन तसेच वाई येथील गार्डन पाहिल्या नंतर शेवटी जेजुरीला सर्व विद्याथ्यांनी दर्शन घेतले. सहली दरम्यान उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण सहल कालावधीत सर्व शिक्षकांनी विद्याथ्यांची योग्य ती काळजी घेत काटेकोर नियोजनासह सहल यशस्वीपणे
पार पाडली, कठीण आणि आव्हानात्मक ठिकाणांवरही विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या नेऊन दाखवण्यात आले, ही बाब पालक वर्गाकडून विशेष कौतुकास्पद ठरली आहे.
याप्रसंगी आयोजित केलेल्या सहलीबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून महाविद्यालयाचे शिक्षक प्रदीप कानहजे, राजेश ठोंबरे, सुनील तांबे, भास्कर केरले, सुनील सागरे, योगेश निंभोरे, एकनाथ जंजाळ, प्रफुल्ल कळम, गजानन सपकाळ, डॉ. गणेश दिवटे, डॉ. रमेश काळे, संजय जाधव, महादेवी ठवरे, अक्षय निकम यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरणारा आहे, अशा भावना पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात आल्या.














